सासरच्या त्रासास कंटाळून विवाहितेची आत्महत्या.”परंडा तालुक्यातील रत्नापुर येथिल घटणा
पुज्य नगरी न्यूज परंडा (दि २१ जुन )
माहेरहुन पैसे घेऊन ये म्हणुन सासरच्या लोका कडून सतत मानसीक व शारीरीक छळ होत असल्याने छळाला कंटाळून विवाहिता सुप्रीया समाधान मोटे, वय 20 वर्षे यांनी विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली हि घटणा परंडा तालूक्यातील रत्नापुर येथे घडली या प्रकरणी पती , सासु , सासरा , ननंद विरोधात अंभी पोलिसात दि २० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की सुप्रीया यांनी माहेरहुन पैसे आणावेत याकरीता , समाधान मुरलीधर मोटे (पती) ,हरिश्चंद्र मोटे (सासरा) जनाबाई मुरलीधर मोटे (सासु), राजकन्या दशरथ कोळेकर (नणंद) सर्व रा. रत्नापूर, ता. परंडा यांनी मागील दोन वर्षापासून वेळोवेळी शारिरीक- मानसिक त्रास देत होते
त्यांच्या या त्रासास कंटाळून दि. 17. जुन रोजी राहत्या घरी सुप्रीया मोटे यांनी विष प्राशन केले होती त्यांना तातडीने उपचारा साठी रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला.
मयत सुप्रीयाचे वडील लक्ष्मण भिमराव मिसाळ रा. पुणे यांच्या फिर्यादी वरून आरोपींविरुध्द भा.दं.वि. कलम- 306, 323, 504, 506, 34 अन्वये दि. 20. जुन रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment