परंडा तालूक्यातील दुधी येथिल रोहयो कामा मुळे मजुरांच्या हताला काम ,दर आठवड्याला मजुरांचे पगार देण्याची मजुरांची मागणी
परंडा तालूक्या्तील दुधी येथिल रोहयो कामावर काम करताना मजुर
सा . पुज्य नगरी ( दि ६ जुन )
परंडा तालूक्यातील दुधी ग्रा .प मार्फत सुरू असलेल्या रोहयो अंतर्गत दुधी शिव ते खासगाव शिवरस्त्या च्या कामामुळे त्या परिसरीत मजुरांच्या हताला काम मिळाल्याने गरीब मजुरांना दिलासा मिळाला आहे .
परंडा तालुक्यातील मजुरांच्या हाताला कामे मिळावे म्हणुन परंडा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर यांनी मजुरांच्या हताला कामाची गरज ओळखुन परंडा तालूक्यात अनेक ठिकाणच्या रोहयो अंतर्गत रस्ता कामाला मंजुरी दिली आहे
परंडा तालुक्यातील दुधी ग्रामपंचायत मार्फत सुरू असलेल्या रोहयो अंतर्गत अडीच कीमी लांबीच्या दुधी शिव ते खासगाव शिव पर्यंतच्या रस्त्याच्या काम सुरू करण्यात आल्याने या परिसरातील मजुरांच्या हताला कामे मिळाले या कामावर महिला मजुर देखील मोठया प्रमाणात काम करीत आहे .
गेल्या अनेक महिन्या पासुन या परिससरातील मजुरांना काम नसल्याने अनेक गरीब मजुरांना आर्थीक अडचणीला तोंड दयावे लागत होते काम सुरू झाल्याने मजुरांना थोड़ा दिलासा मिळाला आहे मात्र शासनाने मजुरांचे पगार दर आठवड्याला करावे अशी मागणी या वेळी मजुरांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताने सांगीतले
Comments
Post a Comment