उपजिल्हा रूग्णालयातील शेवटच्या दोन कोरोना बाधीत रुग्णावर उपचार करून डिस्चार्ज
पुज्य नगरी परंडा ( दि ८ जुन २०२० )
परंडा येथिल उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेले एकुन १३ रूग्णा पैकी ११ रुग्णांवर यशस्वी उपचार करून पुर्वीच सोडण्यात आले होते शेवटचे २ कोरोना बाधीत रुग्णावर उपचार करून दि ८ जुन रोजी डिस्चार्ज देण्यात आला . यावेळी डॉ अबरार पठाण व आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णांना टाळया वाजऊन सुभेच्छा दिल्या व रुग्णांची घरी रवानगी करण्यात आली ,
परंडा तालूक्यातील सरणवाडी येथे दि ११ मे रोजी कोरोना बाधीत पहिला रूग्ण आढळला होता. त्या पाठोपाठ खंडेश्वरवाडी , कुक्कडगाव सह तालूक्यात एकुन १३ कोरोना बाधीत रूग्ण आढळुन आले होते त्या सर्व रुग्णावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून १३ पैकी ११ रुग्णावर उपचार करून डिस्चार्ज देण्यात आले होते तर दोन शेवटच्या रुग्णाना दि ८ रोजी डिस्चार्च देण्यात आला एकुन १३ पैकी १३ रूग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखन्या साठी जिल्हा व तालूका प्रशासणा कडून विविध उपाय योजना करण्यात येत आसुन कोरोना बाधीत रुग्ण सापडलेल्या गावांना कोरोना विषाणुचा संसर्ग रोखन्या साठी गावाला सिल करण्यात आले होते .
Comments
Post a Comment