न्यायालयात सुरु असलेला अपहरणाचा खटला मागे घेत नसल्याने बहिणीची हत्या .परंडा तालूक्यातील रोहकल येथिल घटणा
पुज्य नगरी न्युज (परंडा दि २१ जुन २०२० )
भुम न्यायालयात सुरू असलेला खटला मागे घेत नसल्याने तलवारीने बहिणीचा गळा चिरून हत्या करण्यात आली हि घटणा परंडा तालूक्यातील रोहकल येथे दि २१ जुन रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली या प्रकरणी चौघा भावा विरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे
या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की अनिता निवंता शिंदे उर्फ लाकडी, वय 45 वर्षे, रा. पारधी पिढी, मौजे रोहकल, ता. परंडा यांचे भाऊ- बापूराव, बाळराजा, समाधान, सुदीन हे त्यांच्या घरा शेजारीच राहतात. अनिता शिंदे यांचे पती निवांत बिरक्या शिंदे यांचे वरील चौघानी सन- 2016 साली अपहरण केले होते.
या प्रकरणी अनिता शिंदे यांनी वर नमूद आपल्या चौघा भावांविरुध्द पो.ठा. आंबी येथे फिर्याद दिल्याने भावा विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता .
या अपहरण खटला सध्या भूम न्यायालयात सुनावणीस आहे. बहीण- अनिता हिने न्यायालयात सुरू असलेला खटला सुनावनी दरम्यान माघार घ्यावी या करीता वरील चौघे भाऊ तीच्यावर वारंवर दबाव टाकत होते. त्यांच्या या दडपणास बहीण- अनिता हिने दाद दिली नाही.
याचा राग मनात धरुन दि. 21. जुन रोजी सकाळी 09.00 वा. सु. वरील चौघा भावांनी बहीण- अनिता शिंदे हिस उचलून आपल्या दारा समोर नेउन मारहाण करुन तलवारीने गळा कापून खुन केला आहे.
मयताचे पती- निवांता शिंदे यांच्या फिर्यादी वरून अंबी पोलिसात चौघा भावांविरुध्द भा.दं.वि. कलम- 302, 452, 34, सह भारतीय हत्यार कायदा कलम- 4,25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Comments
Post a Comment