काम पुर्ण झालेल्या विहिरीचे बोगस मस्टर भरून शासणाची फसवणुक , परंडा तालुक्यातील वडणेर ग्रा.पंचायतचा प्रताप , तालुक्यातील अनेक कामावर बोगस मजुर , शासणाच्या लाखो रुपयाची लुट .
परंडा तालूक्यातील विहीरीचे खोदकाम , बांधकाम पुर्ण असताना बोगस मस्टर भरण्यात येत आहे
पुज्य नगरी परंडा online news दि .८ जुन )
परंडा तालूक्यातील वडणेर येथे मग्रारोहयो योजने अंतर्गत मंजुर असलेल्या सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीचे खोदकाम मशीन द्वारे करण्यात आले असुन या कामावर मजुर नसताना , व खोदकाम व बांधकाम पुर्ण असताना देखील अभियंता व ग्रामसेवक यांच्याशी संगणमत करून बोगस मजुरांचे हजेरी पत्रक दाखल करून शासनाची फसवणुक करण्यात येत आहे या प्रकरणी दोषीवर कारवाई करावी अशी मागणी ग्रा .प सदस्य सौ कावेरा मोहिते व सौ नसरीन शेख यांनी दि ५ जुन रोजी जिल्हाधिकारी यांच्या कडे केली आहे .
या प्रकरणी ग्रा .प सदस्या यांनी दि २७ / २ /२०२० रोजी गटविकास आधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार केली होती मात्र या तक्रारीची दखल न घेतल्याने जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे लेखी तक्रार दाखल केल्यावर दि ३ मार्च २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी यांनी तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक ती कारवाई करून जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करावे असा लेखी आदेश परंडा पचायत समितीला देण्यात आला होत मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या आदेशा कडे परंडा पंचायत समिती कार्यालयाने दुर्लक्ष केल्याने मजुरांचे बोगस मस्टर भरण्याचे सुरू असल्याने तक्रारदार ग्राम पंचायत सदस्या मोहिते व शेख यांनी दि ५ जुन रोजी जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या कडे लेखी तक्रार केली आहे .
दि ५ जुन रोजी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की वडणेर ग्रामपंचायतच्या मग्रारोहयो अंतर्गत सार्वजनिक पाणी पुरवठा विहीरीचे खोदकाम मशीन द्वारे करून त्या कामावर बोगस हजेरी मस्टर काढण्यात येत आहे या मध्ये आभियंता , ग्रामसेवक , सरपंच ग्रामरोजगार सेवक यांनी संगणमत केली आहे .
तसेच सदरील विहीरीला पाणी लागले नसताना देखील बांधकाम करण्यात येत आहे या विना उपयोगी विहीरीवर लाखो रुपये वाया घालन्यात येत आहे .
तरी या प्रकरणी दखल घेऊन बोगस मस्टर व माती मीश्रीत वाळुने बांधन्यात आलेल्या कामाचे बील अदा करू नये व उच्च स्तरीय चौकशी करून दोषी असणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक , आभियंता , ग्रामरोजगार सेवक यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे .
Comments
Post a Comment