परंडाच्या अधार संस्थेने दिला बार्शी तालुक्यातील वृद्ध शेतकरी दांपत्यांना अधार
पुज्य नगरी न्यूज परंडा (दि १० जुलै )
धामणगाव ता.बार्शी जि.सोलापूर येथील वृद्ध शेतकरी नरहरी ढेकणे यांना परंडा येथिल अधार सामाजीक संस्थेच्या वतीने दि ९ जुलै रोजी किराणा माल , कपडे औषधे व रोख रक्कम देऊन अधार दिला आहे .
बार्शि तालूक्यातीला शेतकरी नरहरी ढेकणे व त्यांची पत्नी सोजरबाई यांना मुल बाळ नसल्याने ते वयाच्या ८० व्या वर्षी थरथरत्या हताने त्यांची जिरायत शेती करून उदरनिर्वाह भागवत असल्याची माहिती मिळाल्याने या वृध्द दांपत्यांना अधार देण्या साठी संस्थेचे अध्यक्ष जुल्फीकार काझी,सचिवा श्रीमती उर्मिला गरड यांनी दि ९ जुलै रोजी त्यांची भेट घेतली व ३ महिने पुरेल ईतके किराणा माल , कपडे , औषधे , व रोख रक्कम संस्थेच्या वतीने देण्यात आली .
आम्हांला शेतीची कामे होत नाहीत त्यामुळे आम्हांला फक्त खाण्यासाठी आवश्यक सामान द्यावे एवढीच त्यांची माफक अपेक्षा होती
सोजरबाई यांच्या कडे साहित्य सुपुर्द केले.
Comments
Post a Comment