८ वर्षांपासुन फरार असलेला तांदुळवाडी येथिल आरोपीला अटक स्थानिक गुन्हा शाखेची कारवाई
पुज्य नगरी न्यूज ( दि १८ जुलै )
जबरी चोरी प्रकरणातील गेल्या ८ वर्षा पासुन फरार असलेला तांदुळवाडी ता .परंडा येथिल आरोपी शहाजी कल्याण शिंदे, वय 32 वर्षे, याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दि १८ जुलै रोजी अटक केली आहे .
आरोपी शिंदे वर परंडा पोलिसात सन २०१२ साली जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता मात्र तो पोलिसांच्या हाती लागत नव्हता गुप्त खबऱ्या मार्फत माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा लाऊन आरोपी शिंदे याला अटक करून
पुढील तपास काम परंडा पोलिसाच्या ताब्यात दिले आहे.
सदरील कारवाई स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरिक्षक दगुभाई शेख यांच्या मार्ग दर्शनाखाली पोहेकॉ- काझी, पोना- कुनाल दहीहांडे, पोकॉ- सर्जे, आर्सेवाड, महिला पोकॉ- होळकर यांच्या पथकाने केली आहे.
Comments
Post a Comment