रोख रक्कम व सोन्याची आंगठी ची लुट करून मारहान बोडखा येथिल सात जनावर गुन्हा दाखल ,


पुज्य नगरी न्यूज ( परंडा दि १८ जुलै )

किरकोळ कारणा वरून पिता पुत्राला काठीने जबर मारहान करून त्यांच्या खिश्यातील ४ हजार रोख रक्कम  व सोन्याची  ५ ग्रामची अंगठी जबरी काढून घेतली हि घटणा बोडखा ता परंडा येथे घडली  या प्रकरणी ७ जना विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या बाबत पोलिसा कुडून मिळालेली माहिती अशी की बोडखा  येथील खवले कुटूंबातील- मेघनाथ, अविनाश, उमेश, रमेश, मंगेश, विशाल, आदित्य खवले अशा सात जणांनी बेकायदेशीर जमाव जमवून दि. ५ जुलै रोजी सकाळी ९ -३०  वाजेच्या सुमारास गावातील राजेंद्र पाटील यांच्या घरा समोर येउन  त्यांना शिवीगाळ करत होते.
 यावर राजेंद्र पाटील यांनी त्याचा जाब विचारला असता वरिल  आरोपींनी राजेंद्र पाटील यांसह मुलगा- अमित या दोघांना लाथाबुक्क्यांनी, व काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच राजेंद्र यांच्या खिशातील ४ हजार रुपये तर अमित यांच्या बोटातील ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी जबरीने काढून घेतली. 
राजेंद्र पाटील यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या जाबाबावरुन नमूद आरोपींविरुध्द गुन्हा दि१७ जुलै  रोजी गुन्हा दाखल करण्यात  आला आहे.
                                                                        

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न