किरकोळ कारणा वरून चाकु हल्ला आरोपी विरूध्द गुन्हा दाखल


सा . पुज्य नगरी परंडा ( दि ७ जुलै )

कबुतराला टाकलेले धान्य शेळीने खाल्ले या कारणा वरून चाकुने मारून गंभीर जखमी केले ही घटणा  परंडा येथे दि ५ जुलै रोजी सकाळी ९ - ३० वाजच्या दरम्यान  घडली या प्रकरणी आरोपी विरुद्ध दि ७ जुलै रोजी परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की मंगळवार पेठ विभागातील शहा गल्ली येथे यातील आरोपी  तोफीक ईस्माईल शेख याने त्याने पाळलेल्या कबुतरांना धान्य टाकले होते ते धान्य खाजा शहाबर्फीवाले यांच्या शेळीने खाल्ल्याने यातील आरोपी शिवीगाळ करीत होता . शिव्या कश्याला देतो अशी विचारणा शारूख शहाबर्फीवाले याने केल्याने आरोपी तोफीक याने 
शारुखच्या पोटात व धातीत चाकुने मारून जखमी केले .
जखमीला उपचारा साठी सोलापुर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन जखमी शारूख चे पिता खाजा शहाबर्फी वाले यांच्या फिर्यादी वरून 
कलम , ३२५ , ५०४ , नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोना हावळे यांच्या कडे देण्यात आला आहे .

Comments

Popular posts from this blog

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

सोनारी येथील भैरवनाथ शुगर गाळपासाठी सज्ज चेअरमन आनिल सावंत,