अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पुज्य नगरी ( दि २९ )
उमरगा येथे वाळूची अवैद्य वाहतुक करणारा ट्रक स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने जप्त करून उमरगा पोलिसांच्या ताब्यात दिला ही कारवाई दि २९ जुलै रोजी केली या मुळे अवैद्य वाळू वाहतुक करणाऱ्या वाळू माफिया मध्ये खळबळ उडाली आहे
स्थानिक गुन्हे शाखा उस्मानाबाद च्या स्थानिक गुन्हा शा शाखेचे पोलिस उप निरिक्षक पांडुरंग माने यांच्यासह पोलिस नाईक हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- अविनाश मारलापल्ले यांचे पथक दि. 29. जुलै रोजी पोलिस ठाणे उमरगा हद्दीत रात्र गस्त करत होते.
या वेळी ट्रक चालक- महेबुब मेहताब नदाफ व त्याचा सहायक- सय्यद जावेद शेख दोघे, रा. मुरुम, ता. उमरगा हे दोघे ट्रक क्र. के.ए. 56 -3041 ने सुमारे 5 ब्रास वाळु (गौण खनिज) विनापरवाना वाहुन नेत असतांना पथकास आढळून आला सदरील ट्रक जप्त करुन उमरगा पोलिसांच्या च्या ताब्यात दिला आहे.
Comments
Post a Comment