परंडा पोलिसांना हवा असलेला चोरीच्या गुन्ह्यात 3 वर्षांपासुन फरारी आरोपी अटक,
सा पुज्य नगरी ( दि ३१ ऑगष्ट )
परंडा पोलिसांना हवा असलेला चोरीच्या गुन्ह्यात 3 वर्षांपासुन फरारी आरोपी सुनिल पवार यास
उस्मानाबादच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करून परंडा पोलिसाच्या ताब्यात दिले आहे .
पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की सन 2017 साली चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी- सुनिल परमेश्वर शिंदे, वय 22 वर्षे, रा. पिंपरी (जेबा), ता. नेकनुर, जि. बीड हा गेली 3 वर्षे पोलीसांना हवा होता . या फरार अरोपीचा निश्चित ठावठिकाणा समजून येत नव्हता. त्यास स्था.गु.शा. च्या सपोनि- आशिष खांडेकर, सपोफौ- मधुकर घायाळ, तानाजी माळी, भागवत झोंबाडे, धनंजय कवडे, पोना- समाधान वाघमारे, महेश घुगे यांच्या पथकाने दि. 29.08.2020 रोजी परंडा शिवारातून ताब्यात घेउन पो.ठा. परंडा यांच्या ताब्यात दिले आहे.
Comments
Post a Comment