दोन मोटार सायकल सह चोरास अटक परंडा पोलिसाची कारवाई


 पुज्य नगरी ( दिनांक ३ )
परंडा पोलिसांचे पथक रात्रीची गस्त घालीत असताना संशयीत रित्या फिरत असलेल्या दोघा आरोपींची चौकशी केली असता दोन्ही मोटार सायकल  चोरलेल्या असल्याचे उघड झाल्याने एका अल्पवयीन अरोपीस पालकांच्या ताब्यात देण्यात आले तर एका आरोपीस अटक करून न्यायालयात हजर केले असता दि ६ ऑगष्ट पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे .

या बाबत पोलिसा कडून मीळालेली माहिती अशी की दि १ ऑगष्ट च्या  स्त्री परंडा पोलिसाचे पथक नाईट पेट्रोलीग करीत असताना दोन अरोपी मोटार सायकल सह संशायीत रित्या आढळुन आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता 
 MH25-A 7543 हिरो होन्डा ही मोटर सायकल  परंडा  पोलिस ठाण्यात चोरीस गेल्या चा कलम 379 भा.द.वी नुसार गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच दुसरी MH-13-BF7491 ही बार्शी येथुन चोरलेली आहे 
यातील  संशयीत आरोपी आबुजर शेख  वय 17 वर्षे 11महीने हा अल्पवयीन असल्याने त्यांस त्यांचे नातेवाईक यांचे ताब्यात देण्यात आले आहे. 

तर दुसरा आरोपी-महादेव सुरेश पेटाडे वय 21वर्षे यास अटक केले आहे. त्यास दि 6 ऑगष्ट रोजी पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे

सदरची कार्यवाही पोलिस निरीक्षक सय्यद यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉ काळेवाड,पोना-कळसाईन पोना काटवटे,पो. कॉ  माळी ,पो कॉ  कवडे ,पोहेका  शेंडगे यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न