परंडा शहरात व तालुक्यात मोहल्ला क्लिनिक सुरु करा - सामाजिक संस्थांची मागणी*
पुज्य नगरी ( दि १९ )
परंडा शहरातील वाढती कोरोना रुग्ण संख्या कमी करायची असेल,शहर पुर्वपदावर आणायचे असेल तर शहरात मोहल्ला क्लिनिक सुरु करावे त्यासाठी लागणारे साहित्य आमच्या संस्थे मार्फत पुरवेल अशा आशयाचे निवेदन तहसिलदार,गट विकास अधिकारी पं.सं.,मुख्याधिकारी व डॉक्टर असोशियशन परंडा यांना आधार सामाजिक संस्था परंडा व एहसास सामाजिक संस्था च्या वतीने दि.19 रोजी देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की,देशासह संपुर्ण जग कोरोनाच्या महामारीने परेशान आहे त्यावर अद्याप कुठलेही उपाय सापडले नाही त्यामुळे लोकांच्या मनात भिती निर्माण झालेली आहे.पण मोहल्ला क्लिनिक सुरु केल्याने मालेगांव व धारावी येथील रुग्ण संख्या झपाट्याने कमी होऊन तिथले जिवन पुर्व पदावर आले आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सर्दी,पडसे,खोकला,ताप लागून जनता परेशान होत आहे.
कोरोनाच्या भितीमुळे लोक यावर उपचार घ्यायलाही धजावत नाहीत.जरी दवाखान्यात गेले तर त्यांना सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला जातो,सरकारी दवाखान्यात तपासणी साठी गेले की त्याची कोरोना चाचणी केली जाते आणी चाचणी झाली की, रुग्ण कोरोना संक्रमित येतोच असा लोकांचा गैर समज झाल्याने लोकं अंगावर आजार काढतात परिणामी कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
हे थांबवायचे असेल तर मोहल्ला क्लिनिक सुरू करावे जेणेकरुन रुग्ण व डॉक्टर यांच्यातील संबंधामुळे रुग्णांना योग्य सल्ला व योग्य उपचार मिळेल व रुग्ण संख्या कमी होऊन शहर कोरोना मुक्त होईल त्यासाठी लागणारे सुरक्षा किट,औषधे संस्थेच्या वतीने पुरवठा केला जाईल
मोहल्ला क्लिनिक सुरु करावे अशी मागणी करण्यात आली आहे .
निवेदनावर शहरातील विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आधार सामाजिक संस्था परंडा व एहसास सामाजिक संस्था यांच्या वतीने झुल्फीकार काझी,शंकर जाधव,नुसरत करपुडे,राजू शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहेत
Comments
Post a Comment