आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या जवळा येथील सावकारावर गुन्हा दाखल.”



पुज्य नगरी , परंडा दि ९ )

 सावकारा च्या त्रासाला कंटाळून  आंतरगाव  ता. भुम योथिल शेतकरी सुरेश माळी यांनी आत्महत्या केली असून या प्रकरणी परंडा तालूक्यातील जवळा येथिल सावकारच्या विरूध्द परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की  सुरेश सावता माळी- बनसोडे, वय 50 वर्षे, रा. अंतरगाव, ता. भुम यांनी काही महिन्यांपुर्वी भारत बब्रुवान गवारे, रा. जवळा (नि.), ता. पंरडा यांच्या कडून खाजगी व्याजाने कर्ज घेतले होते. त्या कर्ज- व्याजाच्या वसुलीकरीता भारत गवारे व त्यांची सहकारी- आशाबाई हे दोघे सुरेश माळी यांना उचलून नेन्याची धमकी प्रत्यक्षात तसेच मोबाईल फोनद्वारे देत होते.

 त्यांच्या या त्रासास कंटाळून सुरेश माळी यांनी दि. 05.रोजी 11.00 वा. सु. शेतातील झाडास गळफास घेउन आत्महत्या केली होती 

. अशा मजकुराच्या सुजीत सुरेश माळी- बनसोडे (मयताचा मुलगा) यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोन व्यक्तींविरुध्द भा.दं.सं. कलम- 306, 506, 34 अन्वये गुन्हा  दाखल  करण्यात आला  आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न