चंदन चोरांना मालासह अटक स्थानीक गुन्हे शाखेची कारवाई


पुज्य नगरी ( उस्मानाबाद दि १ )

: ज्योतीराम बलभीम रणदिवे, वय 55 वर्षे, रा. सारोळा, ता. उस्मानाबाद हे दि. 30.08.2020 रोजी मध्यरात्री सारोळा येथील आपल्या शेत गट क्र. 412 मधील गोठ्यात झोपले होते. मध्यरात्री  अनोळखी चार चोरांनी  त्या ठिकाणी येउन ज्योतीराम रणदिवे यांचा मोबाईल फोन हिसकावून घेवून ज्योतीराम यांचे हात- पाय- तोंड दोरी- गमजाने बांधून त्यांना काठीने मारहाण करुन शेतातील 2 चंदनाची झाडे कापून चोरुन नेली होती 

. तसेच शेजारील शेतकरी- गौतम राजाराम रणदिवे यांच्याही शेतातील 1 चंदनाचे झाड कापून चोरुन नेले. यावरून पो. ठा.उस्मानाबाद ग्रामीण येथे भा.दं.सं. कलम- 394, 34 अन्वये गुन्हा दि. 30.08.2020 रोजी नोंदवला आहे.
 नमुद गुन्हा तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या सपोनि खांडेकर, सपोफौ घायाळ, पोहेकॉ झोंबाडे, पोना -वाघमारे,घुगे , पोकॉ - मनोज मोरे व गव्हाणे यांचे पथकाने गतीमान तपास करून वरूडा पारधी पिडी ता.जि. उस्मानाबाद येथून बालाजी पवार, दादा पवार , सिद्राम पवार, यांना दि.01. रोजी ताब्यात घेवून नमुद चोरीस गेलेल्या  चंदनाच्या झाडाची लाकडे , ज्योतीराम रणदिवे यांचा मोबाईल फोन व गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा माल जप्त केला आहे. उर्वरित तपास कामी आरोपीस उस्मानाबाद ग्रामीण पो.ठा.च्या ताब्यात देण्यात आले. 
 
 

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न