जिल्हास्तरीय आहार समिती बैठकजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
पुज्य नगरी न्यूज (उस्मानाबाद,दि.25 )
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उस्मानाबाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय आहार समितीची बैठक घेण्यात आली असून यावेळी प्रकल्पनिहाय आढावा घेण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी यांनी अन्न व औषध प्रशासन विभाग, महिला आर्थिक विकास महामंडळ,एम. एस. आर. एल. एम. यांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचना संबंधितांना दिल्या.
या बैठकीस जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अनिलकुमार नवाळे, जिल्हा परिषदचे महिला व बाल कल्याण सभापती सौ.रत्नमाला टेकाळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) श्री.निपाणीकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या श्रीमती कुलकर्णी, कृषि उतपन्न बाजार समितीचे प्रतिनिधी तसेच जिल्हयातील बाल विकास प्रकल्प अधिकारी उपसिथत होते.असे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) यांनी कळविले आहे.
Comments
Post a Comment