पुज्य नगरी न्यूज ची दखल सभापतीचे ड्रायव्हर सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस
पुज्य नगरी न्यूज परंडा ( दि २६ सप्टेबर )
परंडा पंचायत समितीचे सभापती यांचे पती सतीश दैन यांच्या कडून पदाचा गैर वापर करून शासकीय गाडीचा खासगी कामासाठी वापर या मथळ्या खाली पुज्य नगरी मध्ये वृत्त प्रकाशीत झाले होते .
या वृत्ताची दखल घेऊन गटविकास अधिकारी यांनी दि .२५ रोजी सभापतीच्या गाडीवर कार्यरत असलेल ड्रायव्हर सोनवणे यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असुन खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहे .
सभापती यांना केवळ शासकीय कामासाठीच गाडीचा वापर करता येतो मात्र सभापती राजरोस पणे त्यांच्या शेळगाव येथे येण्या जाण्या साठी व इतर कामासाठी ड्रायव्हर च्या ताब्यातील गाडी घेऊन जात होते व गाडीचा वापर खासगी कामासाठी करत होते .
Comments
Post a Comment