बोगस दस्तावेज तयार करून ग्रामपंचायत कार्यालया मध्ये ९ लाखाचा अपहार. सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल _ भुम तालूक्यातील प्रकार



पुज्य नगरी (भुम दि ३  )

बनावट दस्तावेज बनवुन भुम तालूक्यातील चिंचोली ग्रामपंचायत कार्यालयात ९ लाख २८ हजार ९३४ रुपयाचा अपहार केल्या प्रकरणी तत्कालीन दोन ग्रामसेवक व  सरपंचावर  भुम पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या मुळे भ्रष्ट कर्मचाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे .

या बाबत पोलिसा कडून मिळालेली माहिती अशी की   तत्कालीन ग्रामसेवक   प्रदीप मधुकरराव जाधव, रा.महालिंगरायवाडी, ता. उमरगा  ,अनिल सदाशिव चव्हाण, रा. डोंजा, ता. परंडा (सध्या दोघे पंचायत समिती, परंडा येथे कार्यरत आहेत तर सरपंच   महादेव गणपती वारे, रा. चिंचोली यांनी दि. 11. जानेवारी .2019 ते 24. जुन .2020 या कालावधीत संगणमताने बनावट दस्तऐवज बनवून, मुल्यवर्धीत दस्तऐवजाचा गैरवापर करुन मौजे चिंचोली, ता. भुम ग्रामपंचायत कार्यालयात एकुण 9 लाख ,28 हजार ,934 रुपयेचा अपहार करुन शासनाची फसवणुक केली. तसेच घोटाळ्या संबंधीचे पुरावे नष्ट करण्यासाठी ते अभिलेख गायब केले. यावरुन ग्रामसेवक- दत्तात्रय गरड यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 409, 467, 468, 471, 201, 34 अन्वये  दि. 02.09.2020 रोजी गुन्हा  दाखल करण्यात आला .आहे
 
  

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न