इतर मागासवर्गीय योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कार्यालयाशी संपर्क साधन्याचे अवाहन
पुज्य नगरी न्यूज उस्मानाबाद, (दि.03 )
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्यादित, मुंबई अंतर्गत जिल्हा कार्यालय,उस्मानाबाद यांचे मार्फत विविध कर्ज योजनेतंर्गत उस्मानाबाद जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील लाभार्थीना स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याजदाराने कर्ज वितरीत करण्यात येते. त्यानुसार सन 2020- 21 या वित्तीय वर्षाकरती पुढील योजना कार्यान्वित करण्यात येत आहेत.बीज भांडवल योजना:- रक्कम मर्यादा 5 लक्ष रु. महामंडळाचा सहभाग 20 टक्के लाभार्थीचा सहभाग-5 टक्के बॅकेचा सहभाग-75 टक्के थेट कर्ज योजना रु.1 लक्षपर्यंत उपरोक्त दोन्ही योजना जिल्हा कार्यालयात अर्ज उपलब्ध असून अधिक माहितीसाठी इच्छूक लाभार्थींना महामंडळाच्या उस्मानाबाद जिल्हा कार्यालयात संपर्क करावा.
तसेच वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना-10 लक्ष पर्यंत व गट कर्ज व्याज परतावा योजना कार्यान्वित करण्यात येत आहे. उपरोक्त योजनेची अधिक माहितीसाठी महामंडळाच्या वेबसाईट www.msobcfde.org वर उपलब्ध आहे. वरील योजना ऑनलाईन स्वरुपात आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा कार्यालय डॉ.बाबासाहेब सामाजिक न्याय भवन, मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीजवळ, औरंगाबाद रोड, उस्मानाबाद दुरध्वनी क्र. 02472-223863 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय उस्मानाबाद यांनी केले आहे.
Comments
Post a Comment