परंडा नगर परिषदेच्या दोन कर्मचाऱ्यावर फसवणुकीची गुन्हा दाखल
पुज्य नगरी परंडा: ( दि ५ )
शासकीय कार्यालय व निवास्थान साठी आरक्षीत असलेली जागा खुली असल्याचे बनावट प्रमाणपत्र देऊन शासणाची फसवणुक केल्या प्रकरणी परंडा नगरपरिषदेचे दोन कर्मचाऱ्या विरूध्द दि ४ सप्टेंबर रोजी परंडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे .
याबाबत पोलिसा कहून मिळालेली माहिती अशी की नगर परिषदेचे कर्मचारी महेश रतन कसबे व बादेश इब्राहीम मुजावर, दोघे रा. परंडा यांनी दि. 06.08.2020 रोजी पर्यंत संगणमताने बनावट दस्तऐवज बनवून शासनाने गव्हर्नमेंट ऑफीस ॲन्ड स्टाफ क्वार्टरसाठी आरक्षीत केलेली परंडा नगरपरिषद हद्दीतील सर्वे क्र. 234 ‘ब’ मधील 10 आर जमीन खुली जागा असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार करुन शासनाची फसवणुक केली. यावरुन नगरपरिषद लिपीक- रणजित काशीद यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 420, 465, 466, 471, 34 अन्वये गुन्हा दि. 04.09.2020 रोजी नोंदवला आहे.
Comments
Post a Comment