अभिनेत्री कंगणा रानावतच्या विरोधात संतापाची लाट परंडा शिवसेनेच्या वतीने जोडे मारून निषेध
पुज्य नगरी परंडा ( दि ५ सप्टेबर )
मुंबई व मुंबई पोलिसा बद्दल अपशब्द करणाऱ्या अभिनेत्री कंगणा रानावत च्या विरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली असुन परंडा तालूका शिवसेनेच्या वतीने मुजोर अभिनेत्री कंगणाच्या प्रतिमेस जोडे मारून जाहिर निषेध करण्यात आला आहे .
दि ५ रोजी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष गौतम लटके यांच्या मार्गदर्शना खाली
परंडा येथिल शिवाजी चौकात कंगनाच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले .
यावेळी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की कंगणा राणावत हिने मुंबई व पोलिसा बदल अपशब्द केल्याने मुंबईकरांच्या व पोलिसांच्या भावना दुखावल्या आहे .
या मुळे शिवसेनेच्या वतीने कंगणा राणावत हिचा जाहिर निषेध करण्यात येत आहे या वेळी शहर व ग्रामीण भागातील शेकडो शिवसैनीक उपस्थित होते
कंगना राणावतच्या विरोधात राज्यभर संतापाची लाट उसळली असुन शिवसेनेच्या वतीने राज्यभर जोडे मारो अंदोलन करून फोटो जाळन्यात आले आहे ,
निवेदनावर , शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष गौतम लटके , रणजित पाटील , तालुका अध्यक्ष आण्णासाहेब जाधव , अब्बास मुजावर , संतोष गायकवाड , एकनाथ वायसे , उमेश परदेशी , सतिश मेहेर आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत
Comments
Post a Comment