देवेंद्र फडणवीस यांची बार्शी येथील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी
पुज्य नगरी न्युज ( बार्शी दि २१ )
प्रतिनिधी तानाजी घोडके
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बार्शी येथील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली या दौऱ्यात बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या कार्यालयावर धावती भेट दिली .
दि .14 व 15 ऑक्टोबर रोजी अतिवृष्टी झालेल्या बार्शी शहर व तालुक्यात शेतकऱ्यांचे झालेले नुकसान म्हणजेच पिके, शेती उपकरणे व शेततळे,बंधारे यांचे झालेले नुकसान आहे तसेच बार्शी शहरातील नागरिकांच्या घरात पाणी घुसून मोठे नुकसान झाले होते
त्यामध्ये जीवनावश्यक व संसार उपयोगी वस्तू ,घराची झालेली पडझड,
व्यापाऱ्याच्या दुकानात पाणी घुसून झालेले साहित्य यांचे नुकसान
या बाबतीत पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई मिळावी या मागणीचे निवेदन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आ राजेंद्र राऊत यांनी दिले ,निवेदन देताना सोबत नगराध्यक्ष असिफ तांबोळी ,बाजार कमिटी चेअरमन रणवीर राऊत, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले तसेच सर्व भाजप नगरसेवक ,पदाधिकारी,कार्यकर्ते हजार होते
Comments
Post a Comment