बार्शी ग्रामीणचे पोलीस शिपाई रामेश्वर मोहिते यांचे विजेच्या धक्याने निधन



पुज्य नगरी (  बार्शी ११ )
 प्रतिनिधी तानाजी घोडके 
 
बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस शिपाई रामेश्वर मोहिते यांचे दि १० रोजी विजेच्या धक्क्याने  निधन झाले.

 मोहिते हे  चिखली ता.जि उस्माबाद येथील रहिवाशी होते. सध्या ते बार्शी  पोलिस ठाणे येथे कार्यरत होते.
त्यांच्या गावाकडील शेतात ही दुर्घटना घडली.

रामेश्वर मोहिते त्यांच्या प्रेमळ व मनमिळावू स्वभावाने प्रचलित होते. ५ महिन्यापूर्वी त्यांचा विवाह झाला होता. रामेश्वर मोहिते यांच्या जाण्याने संपूर्ण चिखली गावावर शोककळा पसरली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न