मराठा सेवा संघाच्या परंडा तालुका अध्यक्षपदी मोरजकर तर कार्यध्यक्ष पदी नवले यांची निवड
नुतन पदाधिकारी यांचा सत्कार करताना मान्यवर
सा पुज्य नगरी ( परंडा दि १२ )
मराठा सेवा संघाच्या परंडा तालुका अध्यक्षपदी गोरख मोरजकर यांची तर कार्याध्यक्षपदी शरद नवले यांची निवड करण्यात आली आहे.
सोमवार दि १२ रोजी परंडा येथील मराठा सेवा संघाच्या कार्यालयात नवनाथ ( अप्पा ) जगताप यांच्या अध्यक्षते खाली बैठक घेण्यात आली
या बैठकीत तालूका कार्यकारणी ची निवड करण्यात आली .
परंडा तालूका अध्यक्ष पदी गोरख मोरज कर , तालूका कार्यध्यक्ष पदी शरद नवले , उपाध्यक्ष पदी विशाल पवार व महादेव गोडगे यांची निवड करण्यात आली ,
या वेळी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पुढील कार्यास सुभेच्छा देण्यात आल्या या वेळी , काका साळूंके , देवानंद टकले , शशीकांत जाधव , गोविंद जाधव , रवी मोरे , मनोज कोळगे , अंगद धुमाळ , संजय काशीद , गणेश राशनकर, समाधान खुळे ,
राजकुमार देशमुख ,दैवान पाटील , पंकज नांगरे मालिक सय्यद , आदींची उपस्थिती होती
Comments
Post a Comment