नदीच्या पाण्यात बुडून मयत झालेल्या विकास धस यांच्या कुटुंबीयांना तातडीची दहा लाख रुपये मदत द्या- अजिनाथ राऊत यांची मागणी

नदीच्या पाण्यात बुडून मयत झालेल्या विकास धस यांच्या कुटुंबीयांना तातडीची दहा लाख रुपये मदत द्या- अजिनाथ राऊत यांची मागणी 

*अतिवृष्टीमुळे नदीला आलेल्या पुरात बंधाऱ्यात बुडून  झाला होता त्यांचा मृत्यू


पुज्य नगरी न्यूज ( सिरसाव  प्रतिनिधी दि.२० )

परांडा तालुक्यातील मौजे भांडगाव येथील प्रामाणिक व गरीब कुटुंबातील शेतकरी विकास जालिंदर धस यांचा मुसळधार पावसाने गावातील विश्वरुपा नदी वरील बंधाऱ्यात बुडून  दुर्दैवी मृत्यू झाल्याने त्यांचे कुटुंबीयांना तातडीची दहा लाख रुपये मदत देण्याची मागणी अजीनाथ राऊत यांनी प्रशासनाकडे केली आहे.

   याबाबत सविस्तर वृत्त असे की उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात मौजे भांडगाव येथील विकास जालिंदर धस हे गावातीलच विश्वरुपा नदीला आलेल्या पाण्यात दि. १७/१०/२०२० रोजी दुपारी तीन वाजता बुडाले  होते. तब्बल दुसऱ्या दिवशी दि. १८ ऑक्टोंबर २०२० वार शनिवारी रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास विकास जालींदर धस यांचा मृतदेह विश्वरुपा नदीपात्रातील बिरमल रामलिंग शिंदे यांचे शेताच्या बंधाऱ्यात  सापडला होता 
 विकास जालिंदर धस हे अतिशय गरीब कुटुंबातील प्रामाणिक व प्रेमळ व्यक्तिमत्त्व होते व घरातील कर्ता व्यक्ती होता तोच मयत झाल्याने विकासच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. म्हणुन विकास धस यांच्या कुटुंबीयांना प्रशासनातर्फे तातडीची मदत म्हणुन दहा लाख रुपये देण्यात यावेत. अशी मागणी नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस संघटनेमार्फत जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत यांचे वतीने मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांचेकडे करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रती विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, जिल्हाधिकारी उस्मानाबाद, तहसिलदार परांडा यांना देण्यात आल्या आहेत. निवेदनावर अजिनाथ राऊतसह जवळ्याचे सरपंच नवजीवन चौधरी, सुधाकर कारकर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
तसेच निवेदनावर त्वरीत कारवाई करुन सदर मयताच्या कुटुंबीयांना तात्काळ मदत न दिल्यास संघटणेच्या वतीने तहसिल कार्यालय परांडा समोर तिव्र स्वरुपाचे आंदोलन करणार असल्याचा इशाराही संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत यांनी दिला आहे

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न