,बार्शी न्यायालया समोरून दोन आरोपींचा पालयानाचा प्रयत्न हाणून पाडला आरोपी वर गुन्हा दाखल.
भोला आडसुळ सामाजीक कार्यकर्ते
पुज्य नगरी न्यूज ( बार्शी )
प्रतिनिधी तानाजी घोडके )
बार्शी न्यायालयासमोरून दोन आरोपींचा पळून जाण्याचा प्रयत्न दोघांवरही पळून जाण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दुचाकी मोटार सायकल चोरी सह मोबाईल चोरीप्रकरणात बार्शी पोलीस यांकडून अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना बार्शी न्यायालयाच्या परिसरातून पोलिसांच्या हातून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण पळून जाण्याचा प्रयत्न हणून पाडला .
भोला आडसुळ व गणेश भोळे या दोन्ही तरुणांनी समाजीकेच कर्तव्य राखून त्यातील एक आरोपीला पकडून त्याला चांगलीच अद्दल घडवली व दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी पकडून दोन्ही आरोपी विरूध्द बार्शी शहर पोलीस ठाण्यामध्ये
पळून जाण्याचा प्रयत्न केल्यामुळे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरी प्रकरणातील आरोपी क्र 1) सचीन सुभाष शिंदे वय 24 व 2)तुषार जयदेव मगर वय 24 हे उपलाई येथे रहाणारे असून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.
या बाबतीत अधिक माहिती अशीकी स्थानिक गुन्हे शाखा आणि पांगरी पोलीस ठाणे यांनी संयुक्त कारवाईत आरोपी अजय भोसले यांच्यावर घाणेगाव ता तुळजापूर यांना ताब्यात घेतले असता, चौकशी मध्ये असे समजले की यांच्या कडे 4 मोटरसायकली, 10 पावती नसलेले मोबाइल आढळून आले.
तर त्यांच्याजवळ सापडलेली मोटारसायकल बद्दल स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तपास केला असता ,पांगरी पोलीस ठाणे हद्दीतील असल्याचे तपासात सिद्ध झाले,
पांगरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांनी पांगरी पोलीस ठाण्यात वरील दोन्ही आरोपींना ,अटक करून तपस केला असता, आरोपी व त्यांच्या इतर साथीदारांनी विविध ठिकाणावरून या मोटार सायकली व मोबाईल चोरल्याचे कबुली दिली
Comments
Post a Comment