बार्शीत बहुजन समाज पार्टीच्या वतीने बहुजन नायक कांशीरामजी साहेब यांना आदरांजली .
सा .पुज्य नगरी ( बार्शी दि ९ )
प्रतिनिधी प्रमोद घोटकर )
बहुजन समाज पार्टी तसेच बामसेफ डी. एस. फोर चे संस्थापक बहुजननायक, मान्यवर. कांशीरामजी साहेब यांच्या १४ व्या महापरिनिर्वाण दिनी बार्शीत बहुजन समाज पार्टी तालुका व शहर यांच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून मान्यवर कांशीरामजी यांची १४ वा परिनिर्वाण दिनी सामूहिक बौद्ध वंदना घेऊन आदरांजली वाहण्यात अली,
वंचित समाजाला सामाजिक व राजकीय परिवर्तनाकडे आणणारे, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराचे खरे वारसदार यांना आदरांजली वाहण्यात अली, यावेळी बहुजन समाज पार्टीचे विधानसभा अध्यक्ष किशोर कांबळे, बार्शी शहर अध्यक्ष प्रसंन्नजीत नाईकनवरे, उपाध्यक्ष रवि बोकेफोडे, महासचिव श्रीकांत कांबळे , ऍड .शंकर ननवरे व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment