वाघोली तालुका कळब येथे जागतिक किसान दिन साजरा करण्यात आला
पुज्य नगरी न्युज कळंब (दि.15 ऑक्टोबर )
(प्रतिनिधी तानाजी घोडके )
वाघोली तालुका कळब जिल्हा उस्मानाबाद येथे आज दि १५ ऑक्टोबर रोजी जागतिक किसान दिन साजरा करण्यात आला
*स्वयंसेवी प्रयोग शिक्षण संस्थेच्या माध्यमातून
आज दि.15 ऑक्टोबर 2020 रोजी वाघोली येथे
*महिला किसान दिवस* साजरा करण्यात आला.
याचे औचित्य साधत तेथील महिलांनी स्वताच्या कामांची यशोगाथा आपल्या व्यथेमधून मांडली.
आज शेतकरी महिला पुरुषाना ही माघे टाकत बरोबरीने व पुढे जाऊन कामे करत आहेत. जसेकी बी बियाणे निवडून देणे, कोणत्या वेळी कुठले पीक लावायचे याचे नियोजन, मग शेतीची मशागत असो,पेरणी असो,खुरपणी,दुबवणी,कुळवणी, भरडणी,काढणी,फवारणी इत्यादी सर्व कामे या सर्वच कामात 90% पुढाकार घेत आहेत .
सर्वच कामात महिलांचे मोठे योगदान असताना देखील महिलांना काहीच हक्क नाही 7/12 वर नावे नसल्याने माहिलांनी नाराजी व्यक्त केली
महिला किसान दिन वाघोली येथे स्वयंम प्रयोग शिक्षण संस्था दिलशाद तांबोळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला....
Comments
Post a Comment