दहीफळ येथे जागतिक हँडवाश दिन व किसान दिन साजरा
दहीफळ येथे जागतिक हँडवाश दिन साजरा करताना
पुज्यनगरी न्युज (दि.15 ऑक्टोबर)
जिल्हा परिषद उस्मानाबाद स्वयम् शिक्षण प्रयोग युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने हँडवॉश कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबर 2020 रोजी दहिफळ आरोग्य केंद्र तालुका कळंब येथे घेण्यात आला
यावेळी गावातील महिला व प्राथमिक आरोग्य केंद्र दहिफळ येथील सर्व कर्मचारी वर्ग ,आशा वर्कर कार्यकर्ते व आरोग्य सखी कर्मचारी आणि स्वयम शिक्षण प्रयोग चे प्रतिनिधी उपस्थित होते .
या कार्यक्रमात आरोग्य केंद्र दहिफळ येथे हात धुण्याचे प्रात्यक्षिक करुन जागतिक हँडवॉश दिन साजरा करण्यात आला.यावेळी हात धुण्याचे पद्धती सांगून आपले आरोग्य आपले हाती हा संदेश देण्यात आला .
यावेळी स्वयम् शिक्षण प्रयोग च्या साखळीतील आरोग्य सखी गावातील महिला उपस्थित होत्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे MO बनसोडे
यांनी महिलांना मार्गदर्शन केले तर या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवकन्या यांनी केले तसेच दिलशाद तांबोळी यांनी सर्व पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
Comments
Post a Comment