माढा तालूक्यात मुसळधार पावसामुळे कापसेवाडी च्या नर्सरी मधील रोपे वाहुन गेली
नर्सरी मधील रोपे वाहुन गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान
पुज्य नगरी न्यूज ( दि१४.प्रतिनिधी )
[ तानाजी घोडके व प्रमोद घोटकर ]
बुधवार दि १४ रोजी झालेल्या जोरदार पावसाने कापसेवाडी ता .माढा तालूक्यातील शिवारातील रोशन पवार यांच्या नर्सरीतील रोपे वाहुन गेल्याने ४ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे .
पवार यांचे संत महात्माजी नावाने सर्व प्रकारच्या फळभाज्याची नर्सरी अनेक वर्षा पासुन असुन मोठया कष्टाने जोपासलेली रोपे बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाच्या पाण्यात वाहुन गेली आहे .
परतीच्या मुसळधार पावसाने तालूक्यातुन वाहणाऱ्या नद्यांना पुर आल्याने पुला वरून पाणी वाहत आहे या मुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे ,
Comments
Post a Comment