उत्तर प्रदेशातील हाथरस येथे मुलीवर झालेल्या बलात्कार व हत्येच्या आरोपीना फाशी देण्याची एन.डी.एम.जे संघटणेची मागणी
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकासह दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी
पुज्य नगरी न्यूज ( परांडा :दि ९ ऑक्टोबर 2020 )
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे नुकत्याच झालेल्या क्रूर सामूहिक बलात्कार आणि हत्येप्रकरणी मुक्त निष्पक्ष आणि निपक्षपाती तपास करून खटला जलदगतीने साठ दिवसात निकाली काढून आरोपींना फाशीची शिक्षा देऊन तिच्या कुटुंबांना न्याय द्यावा अशा मागणी परांडा तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांच्या कडे नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टिस संघटणेच्या वतीने करण्यात आली आहे.
दि ९ ऑक्टोबर रोजी परंडा तहसीलचे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांनी हे निवेदन स्वीकारून पुढील कार्यवाही प्रस्तावित केले .
ते लवकरच संबंधित कार्यालयाकडे पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मुलीच्या मृत शरीराची रातोरात विल्हेवाट लावणाऱ्या व पीडित कुटुंबाला शेवटचा अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार नाकारणाऱ्या हाथरस जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि संबंधित पोलिस कर्मचारी यांच्यावर पुरावा नष्ट करणे तिच्या शेवटच्या अंत्यसंस्काराचा अनादर करणे गैर कायदेशीररित्या बंदी करणे धमकी देणे पाडीत कुटुंबावर हल्ला करणे व इतर गुन्हे याकरिता अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम आणि नियमानुसार कलम 3(1)(आर),(एस), 3(2)(5अ,) आणि भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 297, 201, 323, 324, 340, 342, 504, 506, नुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली .
हिन्दी व मराठी भाषेत निवेदन सादर करुन सविस्तर असे वृत्तांत नमूद केले आहे. या निवेदनाच्या प्रति माननीय राष्ट्रपती, भारत सरकार ,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल महाराष्ट्र राज्य मुंबई, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश सरकारचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग नवी दिल्ली व अनुसूचित जाती जमाती आयोग महाराष्ट्र राज्य मुंबई यांना पाठवण्यात आले आहेत. या निवेदनावर एनडीएमजेचे जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत, जिल्हाउपाध्यक्ष रामचंद्र कांबळे, जिल्हासहसचिव, संदिप बनसोडे, जिल्हा निरीक्षक कानू सरपणे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सदस्य तानाजी बनसोडे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ शिंदे, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे सदस्य गोवर्धन शिंदे, घारगावचे माजी सरपंच काशिनाथ कांबळे, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे तालुकाध्यक्ष शिवाजी गायकवाड, सहदेव बगाडे, जवळा नि गावचे सरपंच नवजीवन चौधरी, सतीश अंधारे,अर्जुन कोळेकर, कांदलगावचे उपसरपंच तेजस चोबे,महेश अभिमनु फंड, साधू बाळू मस्तुद, अजय सरपणे, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Comments
Post a Comment