छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या आंदोलनाला यश भांडगाव बार्शी मार्गावरील पुलाचे कामाला सुरुवात
पुज्य नगरी न्यूज (परंडा दि ५ )
परंडा आणि भूम तालुक्यातुन पश्चिम महाराष्ट्रात जाण्यासाठी भांडगाव ते बार्शी रोडवरील भांडगाव येथील पूल प्रवाशांसाठी धोकादायक झाला होता, तसेच या पुलावर वारंवार अनेक अपघात देखील घडू लागले होते. प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनलेल्या या पुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे, यासाठी छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या वतीने, प्रतिष्ठानचे आधारस्तंभ शिवश्री रामभाऊ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष धनंजय वळेकर, समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार, महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे संस्थापक प्रदीप डोके, कायदेशीर सल्लगार अॅड अनंत राशीनकर, शिवनेरी पब्लिक स्कूलचे अध्यक्ष धीरज शेळके यांच्या उपस्थितीत परंडा येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग
याठिकाणी लाक्षणिक मोर्चा काढून, पूल दुरुस्तीची मागणी करण्यात आली होती. दिवाळीपर्यंत पुलाचे काम जर नाही झाले प्रतिष्ठानच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला होता. छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या सदर मागणीची दखल घेऊन, सार्वजनिक बांधकाम विभागाने भांडगाव येथील पुलाचे काम त्वरित सुरू केले आहे. छत्रपती संभाजी राजे प्रतिष्ठानच्या आंदोलनाला मिळालेल्या यशाबद्दल आणि प्रवाशांच्या सोयीचे बद्दल, परंडा आणि भूम तालुक्यातील जनतेच्या वतीने कौतुकाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग परांडा यांच्या कामाचे कौतुक करत, प्रतिष्ठान चे आधारस्तंभ शिवश्री रामभाऊ पवार यांनी सदरील विभागाच्या अधिकाऱ्यांचे आणि पत्रकार बांधवांचे आभार मानले. या आंदोलनावेळी प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, मावळे आणि तालुक्यातील युवक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment