बार्शीत घक्कादायक घटणा आणखी एका तरुणाची आत्महत्या
बार्शी दि २९ ( प्रतिनिधी तानाजी घोडके )
- तालुक्यातील आत्महत्येचे सत्र काही केल्या थांबताना दिसत नाही. शहरातील पाटील प्लॉट येथील मंगेश अशोक भाकरे या तरुणाने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. ते 37 वर्षांचे होते.
मंगेशने 1 दिवसापूर्वी फेसबुक पोस्ट लिहली होती. त्यामध्ये, 'कळत नकळत काही चूक झाली असेल तर, माफ करा' असा भावनिक संदेश लिहिला होता. त्यांनतर, रात्री मंगेशने हे टोकाचे पाऊल उचलले. या घटनेनंतर सोशल मीडियातून हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, तरुणाईसाठी प्रबोधनाची गरज व्यक्त करण्यात येत आहे.
Comments