गावकऱ्यांचा देवमाणूस हरपला, डॉ. शशिकांत वाघमोडे यांचं निधन
पुज्य नगरी न्यूज बार्शी दि १ ( प्रतिनिधी तानाजी घोडके )
तालुक्यातील आगळगावसह परिसरातील ग्रामीण भागा , गावखेड्यात गरिबांचे डॉक्टर म्हणून नावलौकिक असलेले डॉ. शशिकांत नागोराव वाघमोडे यांचे सोमवारी मध्यरात्री १.३० वाजता निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी दोन सुना सहा नातवंडे असा परिवार आहे.
डॉ वाघमोडे यांचा आगळगाव येथे वैद्यकीय व्यवसाय होता. मात्र, आपल्या व्यवसायात केवळ वैद्यकीय सेवा देण्याचं काम त्यांनी केलं. पंचक्रोशीत बार्शीच्या डॉ. नाना सामनगावकर यांच्याप्रमाणेच गरिबांचा डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते. अगदी 10-20 रुपयांतही त्यांनी ग्रामीण भागात रुग्णसेवा केली. आगळगाव व परिसरातील सर्व गावात सुमारे ४० ते ४५ वर्षे वैद्यकीय क्षेत्रात स्वतःला झोकून दिले, पैशापेक्षा रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून काम केलं. म्हणूनच, येथील ग्रामस्थांनी देवमाणूस असा उल्लेख त्यांचा केला. त्यामुळेच, त्यांच्या निधनाने गावासह पंचक्रोशीत शोककळा पसरली, तर अनेकांनी त्यांच्या आठवणी जागवत, असा डॉक्टर होणे नाही, असे म्हणत मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना व्यक्त केली. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर भाव पुर्ण वातावरनात अंत्यसंस्कार करण्यात आले.
Comments
Post a Comment