बार्शी तालुक्यातील वैराग चे सध्या मुंबईत कार्यरत असणारे अणूजीव शात्रज्ञ मा. संतोष जठार यांना बार्शी ऑयकॉन पुरस्कार जाहीर.
पुज्य नगरी न्यूज ( बार्शी प्रतिनिधी तानाजी घोडके )
मा. संतोष जठार हे उच्चविद्याविभूषित असून आता सध्या ते मुंबई महापालिकेच्या प्रयोगशाळेचे प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. जठार यांचा उल्लेख देशभरातील अणुजीव शास्त्रज्ञांमध्ये एका अतिशय प्रामाणिक व वेगवेगळी संशोधन करणारे शास्त्रज्ञ असा देशभर लौकिक आहे. तर आपले काम करत असताना त्यांनी मुंबई महापालिकेच्या अन्न व पाणी नमुने तपासणी या प्रयोगशाळेला आय, एस, ओ 17025 मानांकन प्रथम मिळवून दिले आहे तसेच या प्रयोग शाळेस जागतिक दर्जा मिळवून दिला आहे. बर्फ नमुने , शालेय मध्यान्ह आहार, चहा , व इतर घटक व आहार बाबत संशोधन करून त्याचे अहवाल शासनास देऊन ते महाराष्ट्र शासनाने मान्य करून त्याची अमलबजावणीही केली आहे. असे अनेक महनीय कार्य श्री संतोष जठार यांनी केले आहे..त्यांचे कार्य आपण आपल्या आयकॉन सोहळ्याच्या भव्य अशा स्क्रीनवर पाहणार आहातच..
युगदर्शक बार्शी आयकॉन, सोलापूर जिल्हा आयकॉन, पोलीस आयकॉन, महसूल आयकॉन व सरपंच आयकॉन पैकी माँ. संतोष जठार यांना सोलापूर जिल्हा आयकॉन हा मानाचा व सलग आठव्या वर्षात जाणारा पुरस्कार जाहीर करताना आमचा उर अभिमानाने भरून येत आहे.
लवकरच शानदार आणि दिमाखदार सोहळ्यात पुरस्कार प्रदान होणार आहे
Comments
Post a Comment