शेतरस्ते अतिक्रमन मुक्त योजनेचा लाभ घेण्याचे शिवार फाउंडेशन चे अवाहन
पुज्य नगरी न्यूज (उस्मानाबाद दि १ जानेवारी )
शेत रस्त्याच्या अडचणी असतील तर शिवार हेल्पलाइन वर संपर्क करा, या अवाहनाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना योग्य ती माहिती सांगितली जात आहे. पण अर्ज करताना आवश्यक ते कागदपत्र व विहित नमुन्यात अर्ज करण्यात शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत, त्यामुळे प्रकरण निकाली निघण्यात विलंब होऊ शकतो.
अर्ज करताना शेतकऱ्यांनी अर्जदार म्हणून वैयक्तिक नाव व सामूहिक प्रश्न असेल तर इतर शेतकऱ्यांची नावे ही टाकावीत,तसेच मोबाईल नंबर व स्वाक्षरी नमूद कराव्यात. विषय मध्ये योग्य तो गट नंबर / सर्वे नंबर नमूद करून जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांच्या नावे पत्रामध्ये" अतिक्रमण मुक्त शेतरस्ते अभियान" याचाही उल्लेख करावा. सोबत गाव नकाशा व संबंधित शेत रस्त्याचा ७/१२ जोडावा. गाव नकाशा घेण्यासाठी संबधित तलाठी/ग्रामसेवक यांना संपर्क साधावा. पूर्वी अर्ज केलेला असल्यास त्याची पोहोच पावती जोडावी. विहित नमुन्यातील अर्ज संबंधित तालुक्यात तहसील कार्यालय येथे जमा करावा.
अर्ज करताना शेतकऱ्यांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ शिवार हेल्पलाइनला ८९५५७७१११५ संपर्क साधावा असे आवाहन शिवार फाऊंडेशन चे प्रमुख विनायक हेगाणा यांच्याकडून करण्यात आले आहे. हेल्पलाइन सकाळी १० ते रात्री ६ पर्यंत मोफत आहे.
यासाठी मानसिक आरोग्याबाबत मार्गदर्शनासाठी मारिवाला हेल्थ इनिशिएटिव्ह मुंबई, तपस्वी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट उस्मानाबाद, कृषी महाविद्यालय गडपाटी उस्मानाबाद , जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस दल, कृषी विभाग व राष्ट्रीय सेवा योजना या शासकीय, अशासकीय, स्वयंसेवी अशा सर्वच संस्थाचे सहकार्य मिळत आहे.
Comments
Post a Comment