कंडारी येथील जनसेवा परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ.
जनसेवा परिवर्तन पॅनलच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ..
पुज्य नगरी न्यूज कंडारी (शंकर घोगरे ) दि ८ )
तालुक्यातील कंडारी ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी सुरू झाली असुन दि ८ रोजी जनसेवा
परिर्वतन पॅनलच्या उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदीरात मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडुन करण्यात आला.
या वेळी प्रभाग क्र १ चे उमेदवार लता नानासाहेब डांगे , आडगळे उज्वला भिमराव, तिबोळे शाकूंतला विलास,
प्रभाग क्र २ चे उमेदवार राहूल चंद्रकांत डोके,
काशीद महानंदा ,भाऊराव देशमुख, राधा रमेश
तर प्रभाग क्र ३ चे उमेदवार तिबोळे बाबासाहेब मारुती , भगत बापू शिवाजी, कदम लक्ष्मी हनुमंत उपस्थीत होते .
कंडारी ग्रामपंचायत च्या निवडणूकीकडे संपूर्ण तालूक्याचे लक्ष लागले असून दोन पॅनल मध्ये तुल्यबळ लढत होत आहे .९ जागे जागे साठी १८ उमेदवार निवडणूकी च्या अखाडयात उतरले आहेत
प्रचाराचा नारळ फुटताच गावात राजकीय वातावरण ढवळुन निघाल्यास सुरुवात झाली असुन लहाना पासुन वयोवृद्धा पर्यंत राजकीय चर्चा सुरू झाली आहे .पारावर , रस्त्यावर टपरीवर बांधावर देखील राजकीय चर्चा होत आहे . या चुरशीच्या निवडणूकी नंतर ग्रामपंचायतीचे नुतन ग्रापसदस्य
कोण असणार याची उत्सुकता गावाला लागली आहे .
प्रचाराचा नारळ भिवराव देशमुख, ज्ञानदेव देशमुख, नामदेव सुरवसे, मधूकर तिबोळे,
यांच्या शुभ हस्ते फोडण्यात आला .
या वेळी विष्णू देशमुख, भिकाजी तिबोळे, नानासाहेब पडघण, शिवाजी घोगरे, किसन देशमुख बाळासाहेब देशमुख, योगेश भगत, पांडूरंग देशमुख, सचिन करकुटे, सारंग घोगरे, दिलीप मोरजकर, आदेश त्रिंबोळे,रसूल शेख,विठठल दाभाडे, अमोल देशमुख, डिगांबर शिंदे, सुलींदर भोजणे
यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते .
यावेळी जनसेवा ग्रामविकास पॅनलचा प्रचार शुभारंभ काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी मोठ्या थाटात पार .पडला याप्रसंगी गावातील नागरीक, मतदार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Comments
Post a Comment