परंडा पोलिस ठाण्यातील बेवारास मोटार सायकलचे १० मार्च रोजी लिलाव करणार
परंडा पोलिस ठाण्यातील बेवारास मोटार सायकलचे लिलाव करणार
परंडा ( दि ६ मार्च )
परंडा पोलिस ठाण्यात जप्त असलेल्या बेवारस मोटार सायकल मालकांनी मोटार सायकल ची ओळख पटऊन दि ७ मार्च रोजी पर्यंत घेऊन नाही गेल्यास दि १० मार्च रोजी
लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे .
परंडा पोलिसांनी जप्त केलेल्या ४२ बेवारस मोटार सायकल गेल्या अनेक वर्षा पासुन पडून आहे मात्र मोटार सायकल घेऊन जान्या साठी अद्याप कोणीही पुढे आले नसल्याने या पुर्वी ही परंडा पोलिसांनी मोटार सायकल घेऊन जान्यासाठी अवाहन केले होते
या ४२ वाहना मध्ये एक टाटा ट्रक , महिंद्रा जिप , कमांडर , व एक टमटम चा समावेश आहे . या सर्व वाहणांचा दि १० मार्च रोजी स्क्रॅप म्हणुन लिलाव करण्यात येणार आहे .
दोन महिन्यात मोटार सायकलचे मालक पुढे न आल्यास दोन महिन्या नंतर जाहिर लिलाव करुन रक्कम शासनास भरण्यात येणार आहे
असे अवाहन करण्यात आले होते मात्र वाहनांचे मालक पुढे न अल्याने लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे यांनी सांगीतले आहे .
Comments
Post a Comment