परंडा शहराला दुषीत पाणी पुरवठा जनतेचे आरोग्य धोक्यात शुद्ध पाणी पुरवठा करण्याची मागणी



पुज्य नगरी न्यूज परंडा ( दि २५ )
परंडा शहरात दुषीत पाणी पुरवठा होत असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आल्याने तात्काळ शुद्ध पाणी पुरवठा करावा या सह विविध मागण्या   नगरसेवकांच्या वतीने मुख्याधिकारी यांच्या कडे करण्यात आली आहे .

दि २५ मार्च रोजी नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या परंडा शहरात पिवळसर दुषीत पाणी पुरवठा होत आहे . तसेच घंटागाड्या पंधरा दिवसातुन एक वेळा असल्याने अनेक ठिकाणी शहरात कचरा साचलेला आहे गटारी तुंबल्याने डासांचा प्रमाण वाढले आहे या मुळे नागरी कांचे आरोग्य धोक्यात आले आहे .
तरी तात्काळ शहराला शुद्ध पाणी पुरवठा करून गटाराची साफसफाई करून शहरात फवारणी करावी व घंटा गाडया दररोज सुरू कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे .

निवेदनावर शिवसेनेचे नगर सेवक मकरंद जोशी ,  आसीया अब्बास मुजावर, मुसा हान्नुरे , रामदास जाधव , उर्मीला मदने ,समीना लुकडे, यांच्या स्वाक्षऱ्या आहेत .

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न