बार्शीतील न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावू, पालकमंत्र्यांचे आश्वासन



पुज्य नगरी न्यूज बार्शी दि ३१ मार्च 
 ( प्रतिनिधी तानाजी घोडके )

 शहरातील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस लीगल सेलच्यावतीने याबाबत लेखी निवेदनही पालकमंत्र्यांना देण्यात आले. यावेळी, 
*सेलचे तालुक्याध्यक्ष एड. हर्षवर्धन बोधले, इंदापूर राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे अध्यक्ष शुभम निंबाळकर, उमेश नेवाळे, एड. अमोल कुदळे, महेश चव्हाण पंकज पिसाळ आदि उपस्थित होते 
 आपण आवर्जून लक्ष घालून हा प्रश्न संबंधित खात्यातील *मंत्रीमहोदयांसमोर मांडू, असे आश्वासन दत्तात्रय भरणे यांनी दिल्याचे एड. बोधले यांनी सांगितले

बार्शी येथे बार्शी, करमाळा,माढा तालुक्यासाठी 2014 साला पासून जिल्हा व सत्र न्यायालयाचे कामकाज चालू झाले
. त्यावेळी, वकील संघाची लायब्ररी नवीन जिल्हा व सत्र न्यायालयासाठी जागा अपुरी पडत असल्यानं बार्शी वकील संघाने सोडली. आताची इमारत जिल्हा व सत्र न्यायालयासाठी अपुरी पडत आहे
. मा .उच्च न्यायालय, मुंबई यांनीदेखील जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन इमारतीसाठी मान्यता दिलेली आहे बार्शी येथील नवीन न्यायालयीन इमारतीचा प्रस्ताव विधी व न्याय खाते महाराष्ट्र राज्य यांचेकडे प्रलंबित आहे*, तो प्रश्न आपण मार्गी लावावा, अशी मागणी बार्शीतील वकीलांनी केली आहे.

नवीन न्यायालयीन इमारतीचा प्रश्न बार्शी वकील संघाच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. तसेच नवीन न्यायालयीन इमारतीसाठी यापूर्वीच 11 एकर जागा महाराष्ट्र शासनाने संपादित  नियोजित केलेली आहे  त्यामुळे,  मंत्रिमंडळाची मान्यता घेऊन बरेच दिवस प्रलंबित असलेल्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय बार्शी येथील नवीन न्यायालयीन इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्याची आग्रही मागणी राष्ट्रवादी लिगल सेलच्या वतीने करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न