सदाशिव पाटील यांना मा .आ . ज्ञानेश्वर पाटील मित्रमंडळा कडून परंडा येथे श्रद्धांजली



परंडा येथे ज्ञानेश्वर पाटील मित्र मंडळा कडून श्रध्दांजली 

परंडा दि( २४ )
 परंडा पचायत समीतीचे माजी सभापती काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते सदाशिवराव उर्फ बाबासाहेब पाटील चिंचपुरकर ( वय ८७ वर्ष ) यांचे  ( दि .२३ रात्री ८ : ३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. जिप .चे माजी सभापती  रणजितसिंह पाटील यांचे वडील होते 

 वाघ पाळणारे चिंचपूरकर पाटील अशी त्यांची ख्याती होती . तात्कालीन राजकीय परिस्थितीत त्यांचा मोठा दबदबा तर समाजकारण,शैक्षणीक व कृषी क्षेत्रात त्यांनी आपली एक ओळख निर्माण केली होती .

सदाशिव पाटील यांना  परंडा येथे माजी आमदार ज्ञानेश्वर  पाटील मित्रमंडळ व तमाम शिव सैनिकांच्या वतीने परंडा येथे  श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी रमेश परदेशी यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला यावेळी शिवसेना युवा नेते रणजित दादा पाटील, शिवसेना नगरसेवक मकरंद जोशी, नगरसेवक अब्बास मुजावर, राहुल देवळे, प्रितम डाके,विकास साळुंखे व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न