जाकेपिपरी येथील शेतकऱ्यांची खासगी कर्जाला कंटाळून आत्महत्या, पिक कर्ज देन्यास बॅकेने केली टाळाटाळ
पिक कर्ज देन्यास बॅकेने केली टाळाटाळ
परंडा ( दि ४ )
परंडा तालूक्यातील जाकेपिपरी येथील शेतकरी अंकुश बारसकर वय ५८ यांनी खासगी कर्जाला कंटाळून त्यांच्या पाचपिपळा शिवारातील शेतात विषारी तननाशक औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटणा दि ४ रोजी सकाळी उघडकीस आली आहे .
या बाबत आधिक माहिती अशी की मयत शेतकरी अंकुश बारसकर यांना खासगी कर्ज देने असल्याने ते नेहमी मानसीक तनावात होते , त्यांनी पिक कर्ज घेन्या साठी परंडा येथील एसबीआय बॅकेत प्रकरण दाखल केले होते अनेक हेलपाटे मारून देखील म बॅकेने कर्ज दिले नसल्याने ते निराश झाले होते .
त्यांना पाचपिंपळा शिवारात २ हेक्टर५६ आर जमीन असुन शेती करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र शेतीचे उत्पन्न व खर्च यांचा मेळ लागत नसल्याने त्यांच्यावर खासगी झाले होते व बॅक देखील कर्ज देत नसल्याने निराश झाले होते याच गैराश्यातुन दि ३ ऑगष्ट रोजी पाचपिंपळा शिवारातील शेतात गेले व रात्रीच्या सुमारास तन नाशक औषध प्रशान करून आत्महत्या केली ही घटणा दि ४ रोजी सकाळी उघडकीस आली .
या घटने मुळे परिसरात हळहळ व्यक्त करन्यात येत आहे .
शेतकऱ्यांना पिक कर्ज वेळेत वाटप करा असा शासनाचा आदेश असताना बॅका कर्ज देण्यास टाळाटाळ करीत असल्याने शेतकरी वर्गात संताप व्यक्त करण्यात येत आहे .
या प्रकरणी पोलिस व महसुल विभागाच्या वतीने घटणा स्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे
या प्रकरणी परंडा पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास ए.एस.आय जगताप करीत आहेत
Comments
Post a Comment