काक्रंबावाडी येथे आर्मी, पोलिस भरती करणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शन
काक्रंबावाडी येथे आर्मी, पोलिस भरती करणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शन
तुळजापूर पुज्य नगरी
दि. २४ रोजी काक्रंबावाडी येथे कोळेकर महेश यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आणि कोळेकर महेश मित्रपरिवार यांच्या वतीने आर्मी , पोलीस भरती ची तयारी करणाऱ्या मुलांसाठी मार्गदर्शन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी काक्रंबा गावचे सुपुत्र. सचिन चव्हाण हे प्रमुख वक्ते म्हणून लाभले होते. ते आर्मी ची ट्रेनिंग घेऊन आलेले आहेत त्यांनी काक्रंबावाडी गावातील मुलांना मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी शारीरिक चाचणी तसेच लेखी ची तयारी आणि संपूर्ण मेडिकल चाचणी याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. मुलांचे आणि प्रश्न यांचे ही निराकरण केले.
यावेळी काक्रंबावाडी गावचे ग्रामस्थ आणि सर्व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या उपक्रमाचे आणि कोळेकर महेश बजरंग यांचे संपूर्ण गावभरातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment