रुग्णसेवक रुपेश भोसले मुळे अनेक रुग्णांचे मोफत ऑपरेशन
रुग्णसेवक रुपेश भोसले मुळे अनेक रुग्णांचे मोफत ऑपरेशन
रुग्णांचे 1 लाख 50 हजार रु वाचले
पुज्य नगरी न्यूज दि ३ ( सोलापूर प्रतिनिधी राजन क्षत्रिय
सोलापूर येथील रुग्ण सेवक रूपेश कुमार भोसले यांच्या प्रयत्नातुन अनेक रुग्णांना शासकीय योजनेचा लाभ मिळत असुन रमेश देवगन यांच्या ऱ्हदयाचे मोफत यशस्वी ऑपरेशन झाले आहे .
मंगळवारी रुग्णसेवक रूपेश कुमार यांना सौदागर देवगन यांचा फोन आला माझे काका रमेश देवगन यांना छातीत दुखत आहे भोसले यांनी क्षणाचा विलंब न करता
त्यांना गंगामाई रुग्णालयात अनण्यास सांगुन डाॅक्टरांना भेटण्यास सांगितले
डाॅक्टरांनी अंजोग्राफी करुन घेतली व देवगन त्यांच्या हृदयात 100 टक्के एक बाॅल्केज आहे असे सांगून लगेच ऑपरेशन करण्यास सांगितले.
रुपेशकुमार यांनी र तातडीने रेशन कार्ड व आधार कार्ड घेवून येण्यास सांगितले व महात्मा फुले जनआरोग्य योजने चा लाभ मिळून देण्याससाठी आरोग्यमिञ यांना भेटून ते मंजुरीसाठी दिले व आरोग्यमिञांनी ताडतडीने त्याला मंजुरी मिळून दिले
देवगण यांची सकाळी ऑपरेशन करण्यात आले त्याचे ऑपरेशन मोफत झाल्या मुळे रूग्णांना देखील आश्रु आनावर झाले त्यांनी भोसले यांचे आभार व्यक्त केले
Comments
Post a Comment