महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या जिल्हा व शहर सदस्य पदी रुग्णसेवक रुपेशकुमार भोसले सदस्य पदी नियुक्ती


पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज 
 ( सोलापूर प्रतिनिधी राजन क्षत्रीय )

 खा शरद पवार , खा सुप्रियाताई सुळे , उपमुख्यमंञी अजित दादा पवार , प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील , पालकमंञी दत्ताञय मामा भरणे , शहर अध्यक्ष भारत जाधव , कार्यअध्यक्ष संतोष भाऊ पवार यांच्या आदेशाने पक्षाच्या माध्यमातुन गोरगरीब, आनाथ, निराधार , बेवारास, मनोरुग्ण , वृध्द माता पिता , यांची मोफत औषध उपचार , मोफत आॅपरेशन विविध सरकारी हाॅस्पिटल व खाजगी हाॅस्पिटल मधे मिळुन देण्यात भोसले यांचा मोठा योगदान आहे , कोरोनाचा काळात भोसलेयांनी कोव्हिड रुग्णांना मोफत उपचार मिळुन देण्यासाठी आपल्या जिवाची काळजी न करता दिवसराञ रुग्णांसाठी सर्व हाॅस्पिटल मधे जावून त्यांची काळजी व त्यांना अॅडमिट करुन बेड , आॅक्सिजन , वेल्टीलेटर, अनेक सुविधा मिळुन दिले राज्यात व जिल्हात रुग्णसेवक म्हणून त्यांची ओळख आहे . हजारो रुग्णांना त्यांनी महात्मा फुले जन आरोग्य  योजनेचा लाभ मिळुन दिला आहे याची माहिती डाॅक्टर व महात्मा जनआरोग्य योजनेच्या आरोग्यमिञ व संबधित अधिकारी यांच्या मार्फत ते घेवून रुग्णांना मोफत आॅपरेशन व औषध उपचारमिळुनदेतात एकादे आॅपरेशन जर कोणत्याही योजनेत बसत नसेल तर मुख्यमंञी सहाय्यता निधी , सिध्दी विनायक ट्रस्ट , साई ट्रस्ट , या माध्यमातुन निधी मिळून रुग्णांना दिला देतात आश्या रुग्णासेवकाची म्हंजेच रुपेशकुमार भोसले यांच्या कार्याची दखल घेवून पालकमंञी दत्ताञय मामा भरणे यांनी शहर अध्यक्ष भारत जाधव कार्यअध्यक्ष संतोषभाऊ पवार यांच्या आदेशाने भोसले यांची महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा व शहर सदस्य पदी नियुक्त करण्यात आले जिल्हाअधिकारी  व महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे प्रमुख डाॅ वाघमारे यांनी भोसले यांना शुभेच्छा दिल्या रुग्णसेवाकाचे वसा घेतलेल्या भोसले यांच्या निवडी मुळे जिल्हात त्याच्या वर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न