काक्रंबावाडी येथे गणेशोत्सव निमित्ताने कोळेकर महेश मित्रपरिवार यांच्या वतीने घेण्यात आल्या विविध स्पर्धा


 पुज्य नगरी न्यूज ( दि १० )
तुळजापूर काक्रंबावाडी येथे गणेशोत्सव निमित्ताने कोळेकर महेश मित्रपरिवार वतीने घेण्यात आल्या विविध स्पर्धा.
          महेश कोळेकर यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली काक्रंबावाडी या छोट्याशा गावात यावर्षी पहिल्यांदाच लहान मुलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धावणे स्पर्धा, निबंध लेखन स्पर्धा तसेच लिंबू चमचा स्पर्धा. 
         या लहान मुलांच्या स्पर्धेत उस्फुर्तपणे मुलांनी सहभाग नोंदवून या स्पर्धेचा आनंद घेतला. ह्या विविध स्पर्धा घेण्यापाठीमागचा मुख्य उद्देश हा होता की मुलांनी आपले सुप्त गुण बाहेर काढावेत त्यांच्यातील कलेला वाव मिळावा. एक चांगल व्यासपिठ मिळावं. ते काम कोळेकर महेश बजरंग यांनी आपल्या कार्यातून केलेले आहे. आज या विविध स्पर्धेचं तसेच महेश कोळेकर यांचं कौतुक संपूर्ण गावभरातून होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आसु येथील युवकांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

जातीवाचक शिवीगाळ ९ जनाविरुद्ध ऑट्रॉसिटी चा गुन्हा दाखल

पीडीइएचे इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूल व ज्यु.कॉलेज, आकुर्डी येथे 'टॉक ओव्हर कुकीज' इंटर-स्टेट कल्चरल एक्सचेंज प्रोग्रॅम यशस्वीरित्या संपन्न