पाटणबोरी येथे जिल्हा परिषदेचे शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजुर
पाटणबोरी येथे जिल्हा परिषदेचे शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजुर
(पुज्य नगरी न्यूज )
प्रतिनिधी पांढरकवडा :-अमन सिडाम
पाटणबोरी येथील मुख्य रस्त्यावर जुनी ग्रामपंचायत चौकात जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचे निवास स्थान होते. परंतू मागील 10 ते पंधरा वर्षांपासून कोणीच तीथे राहत नसल्यामुळे इमारत अतिशय जीर्ण अवस्थेत होती.सदर जागा जिल्हा परिषदे चि असल्याने तिथे दुकान गाडे काढण्यासाठी श्री.गजानन बेजंकीवार (जिल्हा परिषद सदस्य यवतमाळ)यांनी आग्रहाची भूमिका घेतली.व जिल्हा परिषदेच्या शेष निधीतून 18 लक्ष रुपये मंजूर करून घेतले.त्यातून 2 दुकान गाडे व वरच्या मजल्यावर मोठा हॉल मंजूर करून घेतले
सदर दुकान गाडे मुळे जिल्हा परिषदे च्या उत्पन्नात वाढ होईल व पाटणबोरी येथील नागरिकांना सोईची सुविधा उपलब्ध होईल असे श्री.गजानन बेजंकीवार यांनी सांगितले.तसेच कामाला पन सुरुवात करण्यात आली आहे.व त्यांनी गावाच्या सौंदर्यात या आदी गजाननभाऊ बेजंकीवार यांनी प्राथमीक आरोग्य केंद्र 6.50 कोटी व कालीका माता मंदीर येथे भव्य असे सभागृह 30 लक्ष चे कामे मंजूर करून दिले व ती कामे प्रगतीत आहे. कालीका माता मंदीर परिसर विकास साठी सूध्दा 16 लक्ष निधी मंजूर करून दिले त्यातून कंम्पाऊण्ड वाॅल चे बांधकाम मंजूर करून दिले आहे
Comments
Post a Comment