टाकळी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एन डी एम जे संघटणेचे पोलीस निरीक्षकांना मागणीचे निवेदन
परांडा तालुक्यात वडार समाजाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; एन डी एम जे संघटणेचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
खटला जलदगती न्यायालयात दाखल करुन दोन महिन्यांच्या आत निकाली काढावा*
कुटुंबास मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून वीस लाख रुपये मदत द्यावी*
पुज्य नगरी न्यूज दि 03
टाकळी ता परंडा येथील वडार समाजातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा होण्यासाठी गुणवत्तेवर आधारित तपास करुन दोषारोपपत्र मे. जलदगती न्यायालयात दाखल करुन खटला दोन महिन्यांच्या आत निकाली काढण्याची मागणी नॅशनल दलीत मुव्हमेंट फाॅर जस्टिस संघटणेच्या वतीने दि 02 सप्टेंबर रोजी पोलीस निरीक्षक सुनिल गिड्डे यांचेकडे केली आहे.
पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात मौजे टाकळी ता परंडा जि. उस्मानाबाद येथे दि 30/09/2021 रोजी वडार समाजातील 11 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन परांडा येथे गुन्हा रजी. नं. 328/2021 भादवी 376, 506, कलमांसह पोस्को कायदा 4, 8, 12, कलमान्वये गुन्हा दाखल असुन याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी करत आहेत.
हि घटना माणुसकीला काळीमा फासणारी, अतिशय घ्रुनास्पद निंदणीय व मनामध्ये चिड येणारी आहे. म्हणुन सदर आरोपीला गुन्हा करण्यास सहकार्य करणाऱ्यांना सहआरोपी करुन आरोपींना कठोर शिक्षा होण्यासाठी. आरोपींना बलात्कार करण्यास मदत करणाऱ्या व या गुन्ह्यांत सहभागी असणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन आढळुन आलेल्या सर्व आरोपींना सहआरोपी करावे, सर्व आरोपींचे मोबाईल टॉवर लोकेशन काढुन दोषारोपपत्रात समाविष्ट करावे, गुन्ह्याचा सर्व तपास गुणवतेच्या आधारे करावा, खटला जलदगती न्यायालयात चालवून दोन महिन्यांत निकाली काढावा, या खटल्यात वरिष्ठ विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती करावी, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी घटनास्थळी व फिर्यादीस भेट देऊन फिर्यादी व साक्षीदार यांच्या बाबतीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व प्रकारच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, पीडितांना नियमानुसार मनोधैर्य योजनेअंतर्गत मिळणारे आर्थिक सहाय्य तात्काळ देण्यात यावे, नियमानुसार मिळणाऱ्या आर्थिक अनुदान व्यतिरिक्त मुख्यमंत्री व प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून वीस लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणुन देण्यात यावेत असे म्हटले आहे. या मागण्या मान्य न केल्यास संघटनेच्या वतीने 26 जानेवारी 2022 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद समोर तिव्र आदोंलन करण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर संघटणेचे जिल्हाध्यक्ष अजिनाथ राऊत, जिल्हा उपाध्यक्ष कानिफनाथ सरपणे, जिल्हा कोषाध्यक्ष शिवाजी झोंबाडे, जिल्हा सहसचिव हनुमंत पांगरे, तालुकाध्यक्ष आकाश चव्हाण, रामभाऊ मोरे, बालाजी शिंदे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रती उध्दवजी ठाकरे मुख्यमंत्री महाराष्ट्र, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य, पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य, जिल्हाधिकारी सो कार्यालय उस्मानाबाद, पोलीस अधिक्षक सो कार्यालय उस्मानाबाद, यांना पाठवण्यात आल्या आहेत.
Comments
Post a Comment