नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये देण्याचा मुहूर्त कधी
नियमित कर्ज भरणारा शेतकरी अजूनही या अनुदानापासून वंचित का!
मोहोळ प्रतिनिधी दि २८ (नानासाहेब ननवरे )
राज्य शासनाने प्रामाणिक पणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनात्मक अनुदान त्यांनी जून अखेर त्यांचे कर्ज भरल्यास देण्याची घोषणा केली होती. आज जवळ पास चार महिन्यापेक्षा ज्यादा कालावधी उलटून सुद्धा अद्याप शासनाकडून प्रामाणिक शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतला नाही.हे अनुदान देण्याचा शासन मुहूर्त कधी काढणार? हा केविलवाणा सवाल रेगुलर कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनी केला आहे. नैसर्गिक आपत्ती मुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने महात्मा फुले कर्ज माफी योजना जाहीर केली. मात्र या योजनेत दोन लाख रुपयेच्या आतील थकबाकीदार शेतकऱ्यांना पात्र धरले. मात्र या कर्ज माफीमध्ये प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला नव्हता. त्यामुळे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला होता.
यामुळे प्रामाणिक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचे सरकारने मान्य करून नियमित कर्ज भरणाऱ्या शेतक ऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यत अनुदान देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या नावावरील कर्ज तीस जून अखेर भरावे. म्हणजे हे अनुदान देता येईल हे सांगितले होते.
शेतकऱ्यांनी हे कर्ज भरून चार महिन्यापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र उद्यापही शेतकरी या अनुदाना पासून वंचित आहे. तरी शासनाने हे अनुदान लवकरात लवकर शेतकऱ्यां च्या खात्यावर जमा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांतून व्यक्त होत आहे.
[ ] विशाल सपकाळ (प्रहार तालुकाप्रमुख लवकरच राज्यमंत्री बच्चू भाऊंची भेट घेणार राज्य सरकारने प्रामाणिकपणे नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकरी बांधवांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे जाहीर केले होते.परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही.तरी राज्य सरकारने या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत करून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा.
Comments
Post a Comment