जलकमल ऑरगॅनिक गुळ गळीत हंगाम शुभारंभ.. जिल्हाधिकारी शंभरकर यांच्या हस्ते संपन्न..
पुज्य नगरी ऑनलाईन न्यूज ( दि २९ )मोहोळ तालुका प्रतिनिधी नानासाहेब ननवरे
मोहोळ तालूक्यातील कुरुल येथील जलकमल ऑरगॅनिक गुळ उद्योगाच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा आज गुरुवार दि .२८ रोजी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते विधिवत गव्हाणीचे पूजन करून ऊसाची मोळी गव्हाणीत टाकून शुभारंभ करण्यात आले .
अध्यक्षस्थानी निवृत्त ग्रुप कॅप्टन प्रतापसिंह परदेशी हे तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सदस्य अजिंक्यराणा पाटील हे उपस्थित होते .
यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कारखान्यात फिरून सर्व उत्पादनांची माहिती घेऊन गळीत हंगाम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या
[ ] या हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन २१०० रुपये प्रमाणे दर देण्यात येणार असून तो शेतकऱ्यांच्या खात्यात तीस दिवसात जमा करणार असल्याचे ग्रुप कॅप्टन प्रतापसिंह परदेशी आणि अमर लांडे यांनी सांगितले . येथे सेंद्रिय गूळ, साखर , गूळ पावडर, काकवी आदींचे उत्पादन घेतले जाते असेही त्यांनी सांगितले
यावेळी पंचायत समितीचे सदस्य अजिंक्यराणा पाटील यांनी शुभेच्छा दिल्या .
यावेळी उद्योगपती शैलेश बच्चूवार , ग्रामपंचायत उपसरपंच पांडुरंग जाधव, सदस्य सीताराम लांडे, प्रवीण लांडे, पवन भोसले, विकासरत्न भालेराव , आनंद जाधव, महादेव तळे ,सुहास माळी आदीसह शेतकरी उपस्थित होते . स्वागत व प्रास्ताविक संयोजक अमर तात्या लांडे यांनी केले तर आभार सिताराम दादा लांडे यांनी मानले .
Comments
Post a Comment